मुंडे भगिनी दिल्लीत नितीन गडकरींच्या भेटीला; चर्चा सुरू

pankaja munde
pankaja mundeesakal

नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येतेय. भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) आणि प्रीतम मुंडे (pritam munde) या भगिनी केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेटीला पोहचल्या आहेत. गडकरी यांच्या निवासस्थानी ही भेट होत असल्याचे समजत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पंकजा दिल्लीत आहेत. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही त्या सहभागी झाल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी गडकरी-मुंडे यांच्यातील महामार्गाच्याच विषयावरून होणारा पत्रप्रपंचही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान आता या बैठकीत नेमकी काय चर्चा होते. हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे भगिनींनी आज दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेतली. मतदारसंघातील कामांबाबत ही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी यांनी परळी जिल्ह्याला भरभरून दिले आहे. त्याबद्दल त्यांचे आभारही मानले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. अमित शहा आणि फडणवीस भेटीवर त्यांनी भाष्य टाळले. या शिष्टमंडळात मी नव्हते. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. माझ्या कारखान्यांच्या समस्या मांडायच्या असतील, तर मी शहा यांची भेट घेईल. असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

गडकरी-मुंडेंचा पत्रप्रपंचही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin Gadkari) यांच्या कामाचं कौतुक विरोधक देखील करत असतात. त्यांनी देशभर केलेल्या रस्त्यांच्या कामाचं कौतुक तर नेहमीच होत असतं. मात्र खुद्द भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde )यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने तात्काळ याची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की,

"पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच. त्यांनाही हे अजिबात चालणार नाही. तात्काळ दखल घेतली जाईल,"

असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. सोबतच पंकजा मुंडे यांनी एक फोटो देखील पोस्ट केला . त्यामुळे गडकरी-मुंडे यांच्यातील महामार्गाच्याच विषयावरून होणारा पत्रप्रपंचही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता.

pankaja munde
अखेर फटाकेविक्री बंदी मागे! भुजबळांच्या मध्यस्थीनं सुटला तिढा

नितीन गडकरींचंही उत्तर

या ट्वीटला लगेच नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून उत्तर देण्यात आलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व खराब झालेले रस्त्यांची कामं देखील लवकरात लवकर केली जातील, असं नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे

pankaja munde
त्रुटी आढळल्यास माहिती मागविण्यात येईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com