esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Congress-BJP

मोठ्या नेत्याच्या भाजपा प्रवेशामुळे परभणीत काँग्रेसला बसणार झटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: परभणीचे काँग्रेसचे (Parbhani congress) आमदार आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर (Suresh Warpudkar) यांचे बंधू भाजपात प्रवेश करणार आहेत. विजयराव वरपूडकर (vijay Warpudkar) भाजपात (bjp) प्रवेश करणार आहेत. विजयराव वरपूडकर परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत.

परभणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा धक्का मानला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विजयराव वरपूडकर पक्ष प्रवेश करणार आहेत. विजय वरपूडकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. विजय वरपूडकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा: धडाकेबाज अधिकारी समीर वानखेडेंना NCB मध्ये मुदतवाढ

विजय वरपूडकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे परभणीत भाजपाची ताकत निश्चित वाढणार आहे. सत्ताधारी पक्षाऐवजी त्यांनी विरोधी पक्षाची निवड केली आहे. परभणीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही शेकडो कार्यकर्ते आज भाजपात प्रवेश करतील. आज दुपारी 2 वाजता हा भाजपा प्रवेश होणार आहे.

loading image
go to top