विलंब केल्यास डॉक्टर निलंबित - राजेश टोपे

शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय
rajesh tope
rajesh topesakal
Updated on

मुंबई : शासकीय आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या रुग्णांना इतर विभागांत फिरवून त्यांच्यावरील उपचाराला विलंब करणे, आता संबंधित डॉक्टरांना चांगलेच महागात पडणार आहे. अशाप्रकारे वागणाऱ्या डॉक्टरांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.

काही महिन्यांपूर्वी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी अपघात विभागात दाखल झालेल्या रुग्णाच्या छातीत दुखत असतानाही, त्याला वेगवेगळ्या विभागांत फिरविण्यात आले. हा रुग्ण स्वतः चालत रुगालयात आला असल्याचे कारण देऊन, त्याला स्वतःलाच सगळीकडे फिरावे लागले. वेळीच उपचार न झाल्याने या रुग्णाचा मृत्यू झाला. वास्तविक या रुग्णावर अतिदक्षता विभागात तातडीने उपचार करणे गरजेचे होते. या रुग्णाला स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर देऊन त्याला संबंधित विभागात नेऊन उपचार करणे आवश्यक होते. मात्र, त्याऐवजी त्याला स्वतः चालत अन्य विभागात फिरवण्यात आले. या दरम्यान, निदान आणि उपचार होण्याऐवजी या कालापव्ययामुळे त्याचा मृत्यू झाला.

rajesh tope
उद्धवजी होश में आओ, लोकांचे शाप घेऊ नका - चंद्रकांत पाटील

या संबधी चौकशी करणाऱ्या समितीने याबाबत संबंधित डॉक्टरांवर ठपका ठेवून त्यांना जबाबदार धरले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळत नसतील, तर ते गैर आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी अशा प्रकारच्या हलगर्जीपणास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमाअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करून तत्काळ निलंबित करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

rajesh tope
विठ्ठल मंदिरात घुसणाऱ्या भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये धुमश्‍चक्री!

याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "राज्यातील आरोग्य सेवेत ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही, तसेच अशा प्रकारे हलगर्जीपणा करून रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

IMD predicts heavy rainfall
Latest Marathi News Live Update
State Government Revamps Land Acquisition System; 103 Officer Posts Reorganized
Travel Alert: Pune–Mumbai Passengers Face Delays as 25 Trains Take Alternate Route
Marathi News Esakal
www.esakal.com