पेण : वाशी विभागाची जलवाहिनी पुन्हा फुटली; ऐन दिवाळीत ग्रामस्थांचे हाल

water pipeline leak
water pipeline leaksakal media

पेण : पेण (Pen) तालुक्यातील खारेपाट भागाच्या वाशी विभागाला (vashi area) पाणीपुरवठा करणारी जुनी जलवाहिनी फुटल्याने (water pipeline breaks) ऐन दिवाळीत पाण्यामुळे ग्रामस्थांचे हाल झाले आहे. ही वाहिनी महिन्यातून किमान दोन वेळा फुटत असल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे (water scarcity) लागत आहे. दरम्यान, ही वाहिनी एका शेतातच फुटल्याने एका शेतकऱ्याचे अतोनात नुकसान (farmer loss) झाले आहे.

water pipeline leak
देगलूर-बिलोली पोटनिवडणूक : काँग्रेसकडून भाजपला धोबीपछाड, महाविकास आघाडीची सत्ता कायम

पेण तालुक्यातील वाशी व वडखळ येथील खारेपाटात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही खारेपाट भागातील ग्रामस्थांच्या नळाला तीन दिवसांआड पाणी येत आहे. वाशीनाका ते वाशी ही जुनी जलवाहिनी अत्यंत जीर्ण झाल्याने ती वारंवार फुटत असते. त्यामुळे वाशी खारेपाटची जलवाहिनी फुटण्याचे प्रकार काही नवीन नाही. महिन्यातून दोन ते तीन वेळा जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया जाते. आताही ज्या दिवशी पाणी येणार त्याच दिवशी जलवाहिनी फुटल्याने तीन दिवस तरी आणखी पेणकरांचा घसा कोरडा राहणार आहे. तसेच, ही जलवाहिनी एका शेतात फुटल्यामुळे हजारों लिटर पाणी वाया जाऊन शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

घोषणा कागदावरच

पेणचे हेटवणे ते शहापाडा धरण, शहापाडा धरण ते वढाव जलवाहिनी आणि शहापाडा धरण ते शिर्की जलवाहिनी अशा नव्याने वाहिन्‍या टाकण्याच्या कामाला तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. या कामाला सुरुवातही करण्यात आली; मात्र त्यातच सतत जलवाहिनी फुटण्याचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्याची घोषणा कागदावरच राहिली आहे.
वाशीनाका ते वाशी येथील जलवाहिनीचे काम झाले आहे, तर मग नव्या वाहिनीतून पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा. अन्यथा खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी यांनी दिला आहे.

water pipeline leak
"नवाब मलिक जावयामुळे वेडे झालेले जगातील पहिले सासरे"

"दर तीन दिवसांनी पाणीपुरवठा होतो, तरी पाणीपट्टी जैसे थै आहे. सरकार मुबलक पाणीपुरवठा करत नाही. आता तर पाणीपट्टी १२०० वरून २२०० रुपये केली आहे. जर पाणी मिळत नसेल, तर आम्ही ही पाणीपट्टी का भरावी."
- सी. आर. म्हात्रे, सचिव, खारेपाट विकास संघटना

"जीर्ण झालेली जलवाहिनी माझ्या शेतात नेहमीच फुटत आहे. त्यामुळे शेतीचे फार मोठे नुकसान होत आहे. यावेळी भातशेती कापून ठेवली होती; मात्र जलवाहिनी फुटल्याने भाताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत तत्काळ भरपाई देण्यात यावी."
- विश्वास अंबाजी पाटील, स्थानिक शेतकरी

"जुनी जलवाहिनी अतिशय जीर्ण झाल्यामुळे ती फुटत आहे. या जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल."
- एस. राठोड, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com