esakal | दोन खासदारांविरोधात उच्च न्यायालयात याचिका, दोषपूर्ण EVM वापरल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

high court

दोन खासदारांविरोधात उच्च न्यायालयात याचिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस (MP ramdas tadas) आणि बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (mp prataprao jadhav) यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (nagpur bench of mumbai high court) धनराज वंजारी, बळीराम सिरस्कर यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात त्यांनी हेरपार केली असल्याने त्यांना अपात्र करा, अशी विनंती त्यांनी याचिकेतून केली. याप्रकरणी ३० जुलै रोजी न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या समक्ष सुनावणी होणार असून सर्व प्रतिवादी आपापली बाजू मांडतील. निवडणूक आयोगातर्फे ॲड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली. (petition against mp ramdas tadas and prataprao jadhav in nagpur bench of mumbai high court)

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलला पर्याय : गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ

आमदार राणा यांनी मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला -

बडनेराचे आमदार रवी राणा यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त पैसा खर्च केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगासह राणा यांना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत. आमदार राणा यांच्या विरुद्ध सुनील खराटेसह दोघांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत आमदार राणा यांनी मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला. राणा यांना चौकशीसाठी बोलविले होते. तसेच, त्यांनी निवडणूक खर्चाचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. परंतु, त्यांनी सादर केलेल्या अहवालात त्रुटी आढळून आल्या होत्या. न्यायालयाने आमदार राणा व आयोगाला नोटीस बजावली. आयोगातर्फे ॲड. नीरजा चौबे यांनी नोटीस स्वीकारली असून त्यांनी कोर्टाला उत्तरासाठी चार आठवड्यांचा अवधी मागितला आहे.

loading image