Pik Vima: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्यासाठी मिळाली 3 दिवसांची मुदत वाढ

Pradhan Mantri Pik Vima Scheme : दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत.
Pik Vima
Pik Vimaesakal

Pradhan Mantri Pik Vima Scheme: नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लागवड ते काढणीपश्चात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.

कर्जदार, बिगर कर्जदार, कुळाने अथवा भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपया नाममात्र दरात पीक विमा काढता येतो. पीक विमा काढण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती ती आता 3 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.

राज्यात काही भागात अतिशय कमी पाऊस झाला असून, पीक पेरणीचे प्रमाण अत्यल्प आहे. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

उशिरा पेरणी केल्यानंतर पीक विमा योजनेत शेतकर्‍यांना सहभागी होता येणार नसल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकर्‍यांना सहभागी होण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढ मिळावी अशी मागणी शेतकरी करत होते.

Pik Vima
PM Modi In Pune : PM मोदींच्या कार्यक्रमामुळे साहेबांसाठी इकडे आड-तिकडे विहिर; मोदींसोबत एका मंचावर बसू नये अशी नेत्यांची मागणी

शेती कामात शेतकरी प्रचंड व्‍यस्‍त आहे. या सोबतच राज्यातील ग्रामीण भागात इंटरनेटची समस्‍या आहे, सर्व्‍हर सतत डाऊन राहत असल्‍यामुळे शेतक-यांना शेतीची कामे सोडून पीक विमा भरण्‍यासाठी जावं लागतं. त्यामुळी ही मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे.

Pik Vima
Maharashtra Politics : भाजपला प्रतीक्षा नव्या प्रभारीची! तर विरोधी पक्षनेत्याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम कायम

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी संबंधित बँक किंवा http://pmfby.gov.in व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज करता येईल.

कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देणे आवश्यक आहे. कर्जदार योजनेत सहभागी होण्यास इच्छूक नसल्यास तसे विहित मुदतीत बँकेला लेखी कळवणे आवश्यक आहे.

Pik Vima
Yashomati Thakur Threaten : "धारकरी कोथळा बाहेर काढतील" काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना धमकी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे उद्देश

  • शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

  • शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

  • शेताचे नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेची सरुवात करण्यात आली आहे.

  • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com