PM Kisan Yojana: 1 एप्रिलपासून PM किसानचे पैसे वाढणार! 6000 ऐवजी आता मिळतील एवढे रुपये

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असल्याची चर्चा
PM Kisan Yojana
PM Kisan Yojanaesakal

PM Kisan Yojana : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी या दोघांचेही 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. यावेळी नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना आयकर सवलतीच्या बाबतीत दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

याशिवाय यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असल्याची चर्चा आहे म्हणूनच सर्वांच्या नजरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेकडे असतील.

2024 च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारकडून अनेक लोकप्रतिनिधी आश्वासने दिली जाऊ शकतात.

PM Kisan Yojana
Yoga At Night : शांत झोपेसाठी रोज रात्री झोपण्याआधी करा फक्त हे आसन

सरकार शेतकऱ्यांना देऊ शकते मोठी भेट

या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधीची रक्कम वाढवण्याची घोषणा करू शकतात.

पीएम किसान सन्मान निधी (पीएम किसान सन्मान निधी योजना) मध्ये दरवर्षी मिळणाऱ्या 6 हजार रुपयांच्या रकमेत वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकार हा निर्णय घेऊ शकते.

PM Kisan Yojana
Healthy Nutrients : 2023 मध्ये या पोषक घटकांनी वाढेल तुमची रोगप्रतिकारशक्ती

3 ऐवजी 4 पट पैसे मिळतील

शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिलेली रक्कम 3 ऐवजी 4 पट दिली जाऊ शकते असेही सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक तिमाहीत 2000 रुपये देणे अपेक्षित आहे.

सध्या दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग केले जातात. मात्र बदलानंतर दर तिमाहीला 2000 रुपये दिले जातील. म्हणजेच शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी 8000 रुपये वार्षिक देण्यात येणार आहेत.

PM Kisan Yojana
Stroke-Heart Attack Risk in Winter: थंडीत बाथरूममध्येच जास्त हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या कारण

पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता जानेवारी 2023 मध्येच येणे अपेक्षित आहे. यापूर्वी 12 हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून जमा करण्यात आले आहेत.

बियाणे आणि खतांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. पीएम किसानची रक्कम वाढवल्यास एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा 2000 रुपयांचा हप्ता येणे अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com