पुणे : पोलिस महासंचालक परिषदेला शहांची पहिल्याच दिवशी उपस्थिती; मोदीही येणार

वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

  • पोलिस महासंचालक परिषदेला पहिल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता.०६) रात्री शहरात दाखल होणार 

पुणे : पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) तीन दिवसीय वार्षिक पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून सुरूवात झाली. या परिषदेसाठी पहिल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थिती लावली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. देशाची अंतर्गत सुरक्षा या विषयावर या परिषदेमध्ये चर्चा होत आहे.

ही तर आणीबाणीची वेळ; न्यायव्यवस्थेत बदल झालाच पाहिजे 

देशातील सर्व राज्यांचे पोलिस महासंचालक, विविध तपास यंत्रणांचे प्रमुख यांच्या राष्ट्रीय पातळीरील वार्षिक "डीजी कॉन्फरन्स'ला शुक्रवारपासून सुरूवात झाली. परिषदेसाठी 180 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी उपस्थिती लावली. याबरोबरच गृहमंत्री शहा शुक्रवारी दुपारी शहरामध्ये दाखल झाले असून त्यांनी परिषदेच्या ठिकाणी उपस्थिती लावली. "नार्को टेररीझम' या विषयावरील चर्चेमध्ये ते सहभाग घेणार आहेत. याबरोबरच परिषदेच्या तिन्ही दिवशी शहा उपस्थित राहणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

पंतप्रधान मोदी शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता लोहगाव विमानतळावर दाखल होणार असून त्यानंतर राजभवन येथे मुक्काम करणार आहेत. शनिवारी व रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला संबोधित करणार आहेत. याबरोबरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही या परिषदेत सहभागी होणार आहेत. 

पाकिस्तानात उभे राहणार आंबेडकर भवन

दरम्यान, गुरुवारी रात्रीपासून राजभवन, बाणेर-पाषाण येथील आयसर संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून ते लोहगाव विमानतळापर्यंत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी विशेष पोलिस पथकावर सोपविण्यात आली असून बाहेरील बंदोबस्त पुणे पोलिसांकडे आहे. शुक्रवारी सकाळपासून शहरामध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याची चाचणी घेण्यात आली. त्यानुसार वाहतुक पोलिसांना सज्ज राहण्याच्या सुचना देण्यात आल्या. परिषदेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वाहनांच्या पार्कींगसाठी स्वतंत्र व्यवस्था करून मुख्य प्रवेशद्वारापासून त्यांना ई-कारद्वारे सभागृहाच्या ठिकाणी नेण्यात आले.

रोहित पवारांच्या पाठीवर झेडपीकडून कौतुकाची थाप

परिषदेत काय होणार? 
दरवर्षी होणाऱ्या परिषदेमध्ये राष्ट्रीय सुरक्षिततेला प्राधान्य देऊन त्यादृष्टीने चर्चा केली जाते. याबरोबरच विविध प्रकारच्या समस्या व त्यावरील उपाययोजानांवरही सखोल विवेचन केले जाणार आहे. विशेषतः 370 कलम रद्द केल्यानंतरची स्थिती, जम्मु कश्‍मीरमसह देशाला असणारा दहशतवादाचा धोका, दहशतवाद्यांकडून सीमारेषेचे होणारे उल्लंघन, जम्मु व कश्‍मीरमधील कट्टरपंथी तरुण, नक्षलवाद व नैऋत्य भारतातील परिस्थिती या विषयांवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. मानवी हस्तांतरण, कम्युनिकेशन टेक्‍नॉलॉजी, सोशल मिडीया व सायबर सिक्‍युरीटी या विषयांवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. 
 

आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार; हैद्राबाद पोलिसांची पत्रकार परिषद

"डिजी कॉन्फरन्स' गुजरातनंतर महाराष्ट्रात 
"डिजी कॉन्फरन्स' वर्षानुवर्षे दिल्लीपुरती मर्यादीत ठेवण्यात आली होती. मात्र 2014 पासून नरेंद्र मोदी यांनी ही परिषद देशातील अन्य राज्यांमध्ये नेऊन चर्चा घडविली. तर अमित शहा यांनी या परिषदेच्या नियोजनाची व सुरक्षिततेची जबाबदारी गुप्तचर विभागाकडे (आयबी) दिली. 2014 मध्ये गुहावटी (आसाम), 2015 मध्ये कच्छ (गुजरात), 2016 मध्ये तेलंगाणा (हैद्राबाद), 2018 मध्ये केवाडिया (गुजरात) त्यानंतर यावर्षी ही परिषद महाराष्ट्रमध्ये होत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi and Amit Shah To Attend Top Police Officials Conference In Pune