Vidhan Sabha 2019 : मोदींनी मुंबईला भयमुक्त केलं : योगी आदित्यनाथ

Vidhan Sabha 2019 : मोदींनी मुंबईला भयमुक्त केलं : योगी आदित्यनाथ

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात दहशतवादी हल्ल्याने घायाळ झालेल्या मुंबईला भयमुक्त करुन महाराष्ट्र आणि देश दहशतवादी हल्ल्यापासून मुक्त ठेवण्याचे श्रेय मोदी सरकारला जाते. त्यामुळे पुन्हा देशात नरेंद्र तसे राज्यात देवेंद्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजप-महायुतीला निवडून द्या, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (गुरुवार) केले.

मुंबादेवीचे दर्शन घेऊन सभास्थळी योगी आदित्यनाथ दाखल झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार राज पुरोहित, शायना एन.सी. आणि उमेदवार मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, पांडुरंग सपकाळ यांसह आदी उपस्थित होते. योगी आदित्यनाथ म्हणाले, सकाळपासून महाराष्ट्रात नांदेड, जळगाव आणि मुंबईत सभा घेतल्या. राष्ट्रवाद आणि विकास लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या विकासाचा अजेंडा बदलला आहे. भारत मोठी आर्थिक ताकद बनणार आहे. आमच्या सरकारने कलम 370 रद्द करुन डॉ. आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण केले. शामाप्रसाद मुखर्जींचे स्वप्न पूर्ण करायला 70 वर्षे लागले.

तसेच ते पुढे म्हणाले, मुंबई, महाराष्ट्र आणि देश दहशतवादी हल्ल्यांपासून मुक्त ठेवण्याचे श्रेय मोदी सरकारला जाते. तोंडी तलाक रद्द करुन महिला सन्मानाचे काम केले. भारताचा सन्मान जगात वाढला आहे. पाकिस्तानला भारताने नामोहरण केले.

आघाडी सरकारने केले नुकसान

आघाडी सरकारने महाराष्ट्र आणि देशाचे नुकसान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेले आहे. महाराष्ट्रात पुन्हा फडणवीस सरकार येणार आहे. मुंबईतील पहिल्या सभेची संधी मुंबादेवीच्या चरणी होत आहे. यामुळे, राहुल नार्वेकर यांना आणि पांडुरंग सकपाळ आणि मंगलप्रभात लोढा यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com