Ramdas Futane : "दाढी खाजवत ते म्हणाले..."; गुजरातने पळवलेल्या प्रकल्पावरची कविता ऐकलीत का?

रामदास फुटाणे यांची ही कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSakal

राज्यातले चार प्रकल्प गुजरातला गेले. त्यावरून सध्या चांगलाच गदारोळ सुरू आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातून या सगळ्यांवर टीका केली जात आहे. कवी आणि विडंबनकार रामदास फुटाणे यांनी एक कविता केली आहे.

राज्यातल्या राजकारणावर भाष्य करणारी कवी रामदास फुटाणे यांची कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही कविता अशी आहे -

मिशीला पीळ देत ते म्हणाले,

वेदांतापेक्षाही मोठेमोठे तुमच्याकडे येतील.

प्रदुषणाचे महाराष्ट्रात आणि बाकीचे गुजरातमध्ये जातील.

तेव्हा दाढी खाजवीत हे म्हणाले,

आमच्या दृष्टीने खरंतर हाच खरा संकल्प आहे,

५० आमदारांचं पुनर्वसन हाच मोठा प्रकल्प आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांना ही कविता सद्यस्थितीला साजेशी वाटत आहे. तर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com