One Billion Dollar ची बनावट नोट विक्री करण्याचा प्रयत्न; पोलिसांनी ठोकल्या बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

One Billion Dollar ची बनावट नोट विक्री करण्याचा प्रयत्न; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एक बिलियन डॉलरची बनावट नोट भारतीय चलनानुसार ७५० कोटींची भासवत ती ५० लाख रुपयामध्ये विकत असलेल्या टोळीस पोलिसांनी अटक केली आहे. नांदेडमध्ये आलेल्या तेलंगणातील या टोळीला फसवणूकीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. (Police arrested telangana gang as they were selling fake currency note of one billion dollar)

हेही वाचा: मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांकडून झाडाझडती

ही टोळी वन बिलियन डॉलरची किंमत ७५० कोटी सांगायची आणि मात्र आपण फक्त ५० लाख रुपयात देत असल्याचे सांगत आरोपी सांगायचे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक बिलियन डॉलरची एक बनावट नोट जप्त केली आहे. आरोपींकडून कार, रोख आदी साहित्य असा 11 लाख 52 हजार तीनशे पन्नास रुपयांचा ऐवज सुध्दा जप्त करण्यात आलाय.

नोटचा व्यव्हार करताना भारतीय चलन देणाऱ्यावर हल्ला करुन रक्कम पळवून नेणे, असाही आरोपींचा हेतू होता. असे तपासात उघडकीस आले. या प्रकरणात जवळपास पाच आरोपी सहभागी होते. त्यापैकी तिघा जणांना पोलिसांनी अटक केली तर दोघं जण गर्दीचा फायदा घेत पसार झालेत.

हेही वाचा: बारा तासात दोन मंत्र्यांच्या नावांचा खुलासा, सोमय्यांचं थेट पवारांना आव्हान

ही टोळी आपल्याकडे “एक बिलियन डॉलर्सची नोट असल्याचे सांगून ही नोट पन्नास लाख रुपयांमध्ये विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी सापळा रचून या टोळीला जेरबंद केले. मात्र, यात दोघे जण गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

Web Title: Police Arrested Telangana Gang As They Were Selling Fake Currency Note Of One Billion Dollar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..