

Deepak Kesarkar Under Question Police Call During Rohit Arya Hostage Drama Failed
Esakal
मुंबई, ता. ३ : पवई ओलीसनाट्याच्या तपासात माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मृत आरोपी रोहित आर्यासोबत वाटाघाटी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे जबाब गुन्हे शाखा नोंदवणार आहे. वाटाघाटींदरम्यान केसरकर यांनी आर्यासोबत बोलणे टाळले होते, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. आर्याने हे ओलीसनाट्य का आणि कसे घडवले याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यासाठी सर्व संबंधितांकडे चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जातील. गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाल्याने आता संबंधितांच्या जबाबांद्वारेच या गुन्ह्यामागील हेतू स्पष्ट होऊ शकेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.