रोहित पवारांनी मांडल्या पोलिसांच्या व्यथा; विधीमंडळात वेधलं समस्यांकडे लक्ष

Rohit Pawar
Rohit PawarTeam esakal

मुंबई: विधीमंडळाचं अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये पोलिसांच्या अडचणी मांडल्या आहेत. सदैव जनतेच्या सेवेत असणाऱ्या पोलीस बांधवांना वेगवेगळ्या अडचणींना आणि समस्यांना सामोरे जावं लागतं. त्या समस्यांना समजून घेऊन त्या संदर्भातील प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित केले आहेत. राज्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी वैयक्तिक कुटुंबाची व घराची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र रस्त्यावर असतात. दिवाळी असो अथवा कोणताही सण, उत्सव ही पोलीस मंडळी कायम जनतेच्या सुरक्षेसाठी तत्परतेने उभी असतात, असंही ते म्हणाले. (Rohit Pawar)

Rohit Pawar
शेवटी मुख्यमंत्री भाजपला म्हणाले, कुटुंबियांची बदनामी करु नका, मी येतो तुमच्यासोबत...

अधिवेशनात बोलत असताना आमदार रोहित पवार यांनी पोलिसांसाठी बऱ्याच मागण्या केल्या आहेत. ते म्हणाले की, पोलिसांसाठी असलेल्या कॅशलेस रुग्णालयांच्या संख्येत वाढ करावी तसेच निवृत्तीनंतरही त्यांना आरोग्यसेवा मिळावी, पोलिसांवर येणारा ताण कमी करण्यासाठी त्यांच्या किरकोळ रजेमध्ये वाढ करावी तसेच पोलिसांना राहण्यासाठी प्रशस्त व चांगली निवासस्थाने सरकारतर्फे उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या केल्या. तसेच पोलिसांच्या बाबतीतील इतर विविध अडचणींकडे राज्य सरकारच्या गृह विभागाचे लक्षही वेधले. यावेळी लक्षवेधीला उत्तर देत असताना महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काळात नक्कीच या संदर्भात सकारात्मक पावले उचलली जातील असं आश्वासन दिलं. (Rohit Pawar)

Rohit Pawar
यूपीमध्ये पुन्हा 'योगी' राज; योगींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

दरम्यान, पोलिसांच्या घरांच्या आणि इतरही बाबतीत असलेली सध्याची परिस्थिती ही आमदार रोहित पवारांनी बोलताना विषद केली. त्यामुळे पोलिसांसाठीच्या अडचणी या आता राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच सोडवल्या जातील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. (Rohit Pawar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com