

Police Officer Transfer
ESakal
नवी मुंबई : गृहविभागाने नुकतेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले होते. त्यानुसार पोलीस विभागातील १६ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर आता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या फेरबदलानुसार एकूण १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.