राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशावर राजभवनाची मान्यतेची मोहोर

दुसऱ्यांदा काढलेल्या सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज मान्यतेची मोहोर उमटविली.
राज्यपाल कोश्यारी
राज्यपाल कोश्यारीe sakal

मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने दुसऱ्यांदा काढलेल्या सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज मान्यतेची मोहोर उमटविली.

राज्य सरकारने काढलेला याबाबतचा पहिला अध्यादेश राज्यपालांनी फेटाळून लावला होता तसेच त्यात काही दुरुस्त्या करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. यामुळे राजभवन विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण झाला होता. आता राज्यपालांनी अध्यादेशाला मान्यता दिल्याने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत तात्पुरता तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश आल्याचे मानले जात आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात हा अध्यादेश विधिमंडळात सादर करण्यात येईल. विधिमंडळाच्या मान्यतेनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल पण हा अध्यादेश कायदेशीर कसोटीवर कितपत टिकेल अशी शंका विधी क्षेत्रातील जाणकारांकडून शंका व्यक्त केली जात आहे. राज्यपालांनी अध्यादेशाला मंजुरी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. राजभवनाच्या सर्व शंकांचे आम्ही निरसन केले होते असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान विधानपरिषदेवरील बारा आमदारांची नियुक्ती आणि राज्यातील महिला अत्याचाराच्या मुद्यावरून राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेला महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोध केला होता. ओबीसी राजकीय आरक्षणावरूनही राजभवन विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण झाला होता.

राज्यपाल कोश्यारी
पुणे : दुधाला प्रतिलिटर १ रुपया बोनस

आयोगाला माहिती देणार

राज्यपालांनी स्वाक्षरी केलेला अध्यादेश निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात येईल. पण ज्या ठिकाणी निवडणुका आहेत. तेथील राजकीय पक्ष निवडणूक आयोगास आधीच दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांऐवजी पुन्हा अर्ज भरण्याची मागणी करू शकतात. निवडणूक आयोग हे करू शकतो पण ते करतील की नाही हे माहिती नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

त्यांनाही लाभ मिळू द्या

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश जारी झाला असल्याने निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या जिल्ह्यांतील मतदान पुढे ढकलण्यात यावे. तेथील जनतेला या बदलाचा लाभ मिळू द्यावा अन् ओबीसी आरक्षण तेथेही लागू करावे अशी विनंती निवडणूक आयोगाला राज्य सरकारतर्फे केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय वडेट्टीवार यांच्यात या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या आरक्षणाबाबत विधी विभागाने नोंदवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आज मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांच्याशीही सल्लामसलत केली. सह्याद्री अतिथीगृहामध्ये या नेत्यांची भेट झाल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com