तंत्रनिकेतनच्या प्रवेशासाठी तब्बल नऊवेळा मुदतवाढ, आता ३ नोव्हेंबरपर्यंत करता येतील प्रवेश

संदीप लांडगे
Saturday, 31 October 2020

तंत्रनिकेतन प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार आता तीन नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

औरंगाबाद : तंत्रनिकेतन प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार आता तीन नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. १० ऑगस्टपासून सुरु असलेल्या प्रक्रियेत नऊ वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दहावी आणि बारावीनंतर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Job Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात

अर्ज सादर करणे, त्यांची पडताळणी करण्याची मुदत ३ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी नऊवेळा मुदतवाढ देवूनही आतापर्यंत राज्यात ८० हजारांपर्यंत अर्ज दाखल झाले आहेत. अभियांत्रिकी पदविका, बारावीनंतरच्या फार्मसी, सरफेस कोटिंग, टेक्नॉलॉजी हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी आदी पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जासह कागदपत्र तपासणी, अर्ज निश्चिती ३ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी लागेल. अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 

'बामु' विद्यापिठाचा एम.फिल. अभ्यासक्रम सुरूच राहणार

थेट द्वितीय वर्षासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज
दरम्यान थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेलादेखील मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रभाव आणि महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचा कमी मिळणारा प्रतिसाद यामुळे ही मुदतवाढ देवून वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. आता ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून, तात्पुरती गुणवत्ता यादी ७ नोव्हेंबररोजी जाहीर होईल. आक्षेप नोंदविण्यासाठी ८ ते १० नोव्हेंबरपर्यंतचा अवधी असणार आहे तर १२ नोव्हेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहिर होईल.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polytechnic Admission Extended, Now Get Till 3 November