इतिहासात प्रथमच खातेवाटप लांबणीवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 11 December 2019

१९९९ मधील घटनाक्रम

  • ७ ऑक्‍टोबर निवडणूक निकाल जाहीर
  • १८ ऑक्‍टोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी
  • १९ ऑक्‍टोबर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार
  • २७ ऑक्‍टोबर मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार

राज्यात शपथविधीला १३ दिवस उलटूनही सापडेना मुहूर्त
मुंबई - मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन १३ दिवस उलटले, तरी खातेवाटपाला मूहूर्त सापडला नाही. ही बाब राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असल्याचे विधिमंडळातील नोंदीवरून पुढे आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तातडीने मंत्रिमंडळ अस्तित्वात आले असून, खातेवाटपही तातडीने करण्यात आले होते. १९९९ मधील निवडणुकीच्या निकालानंतर सरकारचा शपथविधी दहा दिवस लांबला होता. त्याच वर्षी शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्या वेळी दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या होत्या. मात्र, तेव्हा शिवसेना-भाजप युतीत एकमेकांच्या जागा पाडापाडीचा खेळ झाल्याने युतीच्या जागा सरकार बनविण्यासाठी कमी पडत होत्या. त्या वेळी कार्यकर्त्यांच्या प्रचंड दबावामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या सरकारमध्ये शेकाप आणि रिपब्लिकन पक्षाचाही समावेश करण्याचा निर्णय झाल्यावर जंबो मंत्रिमंडळ तयार झाले होते. त्यामुळे सरकारचा शपथविधी तीन टप्प्यांत पार पडला होता आणि खातेवाटपही लगेच करण्यात आले होते.

शरद पवारांना दरवेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : फडणवीस

यंदा सरकार स्थापन करण्यास बराच उशीर झाला. मुख्यमंत्रिपदाच्या वाटपावरून शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. या प्रक्रियेला निकालानंतर जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटला. विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्‍टोबरला लागला असताना, ठाकरे सरकारचा शपथविधी २८ नोव्हेंबर रोजी झाला. मात्र शपथविधीला आज १३ दिवस उलटले असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही. ही घटना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असल्याचे विधिमंडळातून सांगण्यात आले.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

नागपूर अधिवेशन सुरू होत आहे. यापूर्वी खातेवाटप झाले नाही, तर उत्तरे कोण देईल, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. अधिवेशन म्हणून सरकारची फक्‍त औपचारिकता सुरू आहे.
- देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: post distribution long first time in history