esakal | मोदींनी भीतीमुळे स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं; प्रकाश आंबेडकरांनी लगावला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

modi prakash ambedkar

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं गुजरातमध्ये उद्घाटन झालं. तसंच या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नावही देण्यात आले.

मोदींनी भीतीमुळे स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं; प्रकाश आंबेडकरांनी लगावला टोला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं गुजरातमध्ये उद्घाटन झालं. तसंच या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नावही देण्यात आले. गुजरातच्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. सामना सुरु होण्याआधी एका कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या उपस्थितीत स्टेडियमच्या नावाची घोषणा करण्यात आली. यानंतर क्रिकेटप्रेमींसह विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम केलं असं म्हणत चाहत्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींनी घाबरून स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं असं म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव स्टेडियमला दिल्यानं सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलायला नको होते अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटली आहे. मोदी सरकारवर यावरून जोरदार टीकाही केली गेली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी स्टेडियमच्या नामकरणावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्र सोडले आहे. ते म्हणाले की, देशाला काय नेता मिळाला आहे? लोक आपल्याला विसरून जातील याची त्यांना चिंता आहे. लोकांवर विश्वास नाही की आपल्या मृत्यूनंतर कोणी त्यांना विसरतील, कोण लक्षात ठेवेल की नाही. म्हणूनच त्यांनी मृत्यूआधी स्टेडियमला आपलं नाव दिलं आहे. 

हे वाचा - नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखलं जाणार जगातलं सर्वात मोठं स्टेडियम

नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरी डे नाइट कसोटी सुरु आहे. सामना सुरु होण्याआधी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्धाटन करण्यात आलं. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, क्रीडा मंत्री किरण रिजिजू, गुजरातचे राज्यपाल देवव्रत, बीसीसीआय सचिव जय शहा हेसुद्धा उपस्थित होते. 

नरेंद्र मोदी स्टेडियम हे खरंतर सरदार पटेल स्पोर्ट्स एनक्लेवचा एक भाग आहे. 263 एकर परिसरात असलेल्या य़ा एनक्लेवमध्ये इतर खेळांसाठीची मैदाने आणि सोयीसुविधा आहेत. यात नरेंद्र मोदी स्टेडियम जे जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. नाटाटोरियम, अॅथलेटिक्स, ट्रॅक अँड फिल्ड, फुटबॉल स्टेडियम, हॉकी आणि टेनिस स्टेडियम, इनडोअर स्पोर्ट्स हॉल्स, आउटडोअर फिल्ड्स, स्केटिंग एरिया, बीच व्हॉलीबॉल, बोटिंग सेंटर यांचा समावेश आहे. 

loading image