Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना भाजपने दिली होती राष्ट्रपती पदाची ऑफर? स्वतःच सांगितलं धुडकावण्याचं कारण

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एका मुलाखतीमध्ये राष्ट्रपती पदाबद्दल भाष्य केलं आहे. भाजपकडून आपल्याला राष्ट्रपती पदाची ऑफर होती, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkaresakal

मुंबईः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एका मुलाखतीमध्ये राष्ट्रपती पदाबद्दल भाष्य केलं आहे. भाजपकडून आपल्याला राष्ट्रपती पदाची ऑफर होती, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

'लोकशाही न्यूज पॉडकास्ट'मध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अगोदर मला राष्ट्रपती पदाची ऑफर भाजपने दिली होती. ते पुढे म्हणाले की, वयाची सत्तरी पूर्ण करताय तर राष्ट्रपती व्हा, असं भाजपने म्हटलं. पंरतु मी सांगितलं- अजून माझ्याकडे दहा वर्षे आहेत. तुम्ही मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करताय का?

Prakash Ambedkar
Wrestling Federation of India : युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा मोठा निर्णय! भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन घेतलं मागे

आंबेडकर पुढे म्हणाले, २०२४ मध्ये सर्व राजकीय पक्षांनी व्यवस्थित काम केलं तर मी तुमच्याविरोधात (भाजप) लढणार आहे. असं म्हणत आपण राष्ट्रपती पदाची ऑफर फेटाळल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

भाजपने राष्ट्रपती पदाची ऑफर दिल्याच्या दावा केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यात भाजपने वयाचा मुद्दाही उपस्थित केला होता. त्यामुळे भविष्यात प्रकाश आंबेडकर राष्ट्रपती होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Prakash Ambedkar
CM Eknath Shinde : लालपरीचे गावकऱ्यांसोबत एक ऋणाबंधाचे नाते, ते पुढेही जपले गेले पाहिजे

राज्यामध्ये महाविकास आघाडीने कंबर कसली असून मोठ्या प्रयत्नांनंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप जागावाटपचा निर्णय मात्र झालेला नाही. त्यानंतर निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com