Pawar Vs Shinde : पवारांच्या विधानावरुन प्रणिती भडकल्या, पण 'सोलापूर'चा 60 वर्षांचा इतिहास काय?

Praniti Shinde on Rohit Pawar
Praniti Shinde on Rohit Pawaresakal

Rohit Pawar News

राज्यात एकीकडे पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरुय तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरु आहे. हा वाद सुरु असतांनाच आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येतं आहे. त्याला कारण ठरलंय रोहित पवारांनी केलेलं सोलापूर मतदार संघाबाबतचं एक विधान आणि त्या विधानाला काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी दिलेलं उत्तर. हे नेमकं प्रकरण काय आहे? शिंदे-पवार वादाच्या ठिणगीत सोलापूर मतदार संघाचा इतिहास काय सांगतो? हे जाणून घेऊयात...

रोहित पवार काय म्हणाले होते?

माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, सोलापूर लोकसभेची जागा कोणी लढवायची, याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल. त्यांनी सोलापूर लोकसभा जागेवर अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचा दावा सांगितल्यामुळे सोलापुरात दोन्ही काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले. खरं तर सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनवेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूरची राखीव जागा काँग्रेसने स्वतः न लढविता राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी स्थानिक पातळीवर सुरु असल्याची चर्चा आहे.

Praniti Shinde on Rohit Pawar
Nitin Gadkari: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुख्यमंत्र्यांना ट्रेनने प्रवास करावा लागला; थेट गडकरींना पत्र

प्रणिती शिंदेंचं प्रत्युत्तर

रोहित पवारांच्या याच विधानाला उत्तर देताना काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, कोण रोहित पवार? ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत, त्यामुळे त्यांच्यात अजूनही मॅच्युरिटी आली नाही. हा पोरकटपणा आहे, अशी परखड प्रतिक्रिया प्रणिती शिंदेंनी दिली. शिंदे यांच्या याच विधानामुळे आता राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतलाय. रोहित पवारांचे समर्थक तसेच कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. इतकचं नाही तर रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात पोस्टरबाजीही केली आहे.

हे सगळ सुरु असतानाच रोहित पवारांनी एक ट्विट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वाद अजूनही निवळला नाहीये. इतकंच नाही हा वाद सुरु असतानाच काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात भेटही झाली. मात्र हा वाद अद्याप तरी निवळला नाही.

Praniti Shinde on Rohit Pawar
Devendra Fadnavis : मी यांच्या बापालाही घाबरत नाही; फडणवीसांची जीभ घसरली

सोलापूर मतदार संघाचा इतिहास काय सांगतो?

1962 ते 1991 पर्यंत सोलापूर मतदासंघावर सलग काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय. त्यानंतर कोणत्याही पक्षाला सातत्य ठेवता आलेले नाही. सुशीलकुमार शिंदे 1998 साली पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर 1999 मध्ये देखील दुसऱ्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले. 2003 मध्ये खासदारकीचा राजीनामा देऊन ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रतापसिंह मोहिते पाटील निवडून आले होते. तर 2004 मध्ये भाजपचे सुभाष देशमुख यांना निसटता विजय मिळाला.

2009 मध्ये सुशीलकुमार शिंदे खासदार म्हणून निवडून आले देशाचे गृहमंत्री झाले. मात्र 2014 मध्ये मोदी लाटेचा त्यांना फटका बसला. एकंदरीतच इतिहास पाहता सोलापुरात काँग्रेसचं बलाबल राहिलंय. मात्र २०१४ नंतर सोलापुरात काँग्रेसला सतत पराभवाचा सामना करावा लागतोय. असं असलं तरी याच सोलापुरातून सलग तीन टर्म काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार आहेत. त्यामुळे सहाजिकच आहे त्यांची तयारी आगामी लोकसभेसाठी असणार. त्यामुळेच रोहित पवारांच्या एका विधानावरुन हा सगळा वाद सुरु झाला त्याला हा सगळा इतिहास कारणीभूत आहे. त्यामुळे आता शिंदे-पवार वाद मिटणार का? आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघ कोणाकडे जाणार? असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जावू लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com