
राज्यात हनीट्रॅपच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. यातच आता एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलीय. खडसेंनी यावर प्रतिक्रिया देताना हे होणारच होतं असं म्हटलंय. तर गिरीश महाजन यांनी मला याची माहिती नव्हती, आता काही झालं की यांनी केलं अन् षडयंत्र आहे असं म्हणणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया दिलीय.