''नाना, पाहतो तू परत कसा जातो?''; प्रसाद लाड यांचं पटोलेंना आव्हान

Prasad Lad Challenge Nana Patole
Prasad Lad Challenge Nana Patole e sakal

मुंबई : काँग्रेसने तिकीट काढून मुंबईतील मजुरांना बिहार आणि उत्तर प्रदेशात पाठवले. यामुळे देशात कोरोना (Corona) पसरला. त्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा नाना पटोलेंनी (Nana Patole) दिला आहे. त्यावर आता भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी प्रतिआव्हान दिलं आहे.

Prasad Lad Challenge Nana Patole
काँग्रेस उत्तर भारतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : नाना पटोले

प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट आव्हान दिलं आहे ''नाना हिम्मत आहे, तर उद्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर १० वाजता तू येऊनच दाखव. नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही भाजपवासी नाही. सागरवर तू ये. पाहतो तू परत कसा जातो?'' अशा शब्दात प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंना आव्हान दिले आहे.

नाना पटोले नेमके काय म्हणाले होते? -

महाराष्ट्राने कोरोना पसरवला, असं मोदी म्हणाले. त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. पण, आम्ही हे अजिबात सहन करणार नाही. नरेंद्र मोदी जनतेची माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा नाना पटोलेंनी दिला होता.

नेमकं प्रकरण काय? -

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना संसदेत काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत. देशात कोरोना पसरवण्यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी तिकीट काढून देऊन मुंबईतील मजुरांना उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाठवलं. त्यामुळेच कोरोना देशभर पसरला, असं मोदी म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्या बंगल्याबाहेर देखील निदर्शने झाली होती. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com