Prashant Koratkar: कोरटकरची अटक खरंच बेकायदेशीर? तयारी दाखवूनही पोलिसांनी चौकशीला का बोलावलं नाही? 'कोर्टरुम'मधला युक्तिवाद

सौरभ घाग यांनी सुरुवातीला कोल्हापूर पोलिसांच्या तपासावरच ताशेरे ओढले. कोरटकरवर मीडिया ट्रायल केला जात आहे. त्याच्या अटकेची गरज नव्हती. याशिवाय, अटकेआधी पोलिसांनी नोटीस देणं आवश्यक होतं.
prashant koratkar
prashant koratkaresakal
Updated on

इंद्रजित सावंत धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी अखेर प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं कोरटकरला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्ष आणि इंद्रजित सावंतांचे वकील असीम सरोदेंकडून ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण, कोर्टानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com