Devendra Fadnavis New Rule Taxi : प्रताप सरनाईकांच्या निर्णयाला देवेंद्र फडणवीसांची केराची टोपली; रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

Marathi learning deadline : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलले. रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी आता एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
Devendra Fadnavis New Rule Taxi

Devendra Fadnavis New Rule Taxi

esakal

Updated on

Devendra Fadnavis Marathi language : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली मुदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवून एक वर्ष केली आहे. त्यामुळे महायुती सरकारमधील शिवसेना आणि भाजपमधील मतभेद पुन्हा समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, परिवहनमंत्र्यांनी १५ ऑगस्टनंतर मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. मात्र, रिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या निर्णयात बदल करत एक वर्षाची मुदतवाढ दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com