
"ओक्केमध्ये महाराष्ट्र"; 'झाडी डोंगर हाटील'चं 'वारी' व्हर्जन; पाटलांची चर्चा
मुख्यमंत्री शिंदेंच्या बंडाच्या काळात चर्चेत आलेले शिंदे गटातले आमदार शहाजी पाटील यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंसोबत काही आमदारांनीही दर्शनासाठी हजेरी लावली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शहाजी पाटलांनी 'झाडी, डोंगार, हाटील'च्या शैलीतच पुन्हा एक डायलॉग म्हटला आहे. (Maharashtra Politics News)
हेही वाचा: 'झाडी, डोंगार अन् हाटील'चं कौतुक सांगणाऱ्या आमदाराची संपत्ती माहितीये का?
मुख्यमंत्री शिंदेंसोबत विठोबाच्या दर्शनाला जाता-जाता शहाजी पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या खास आणि प्रसिद्ध शैलीत ते म्हणाले, काय वारी, काय गर्दी, काय विठ्ठल रखुमाई, काय दर्शन घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आईसाहेब लताताई ओक्केमध्ये सगळा महाराष्ट्र. आता काळजीच नाही.
हेही वाचा: शहाजी पाटलांचं, "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील", विधानसभेतही ''ओके"मध्ये
शिवसेनेतून बंड करत वेगळे झाल्यानंतर एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार गुवाहाटीमधल्या एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती. त्यामध्ये ते गुवाहाटीतल्या निसर्गाचं आणि आपण राहत असलेल्या परिसराचं वर्णन करत होते. 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, ओक्केमध्ये सगळं!' असं म्हणत त्यांनी आपली ख्यालीखुशाली कळवली होती.
हेही वाचा: Video: शहाजी बापूंच्या पत्नी म्हणतात समदं ओकेमध्ये...
तेव्हापासून शहाजी पाटलांची सोशल मीडियासह सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू होती. आता त्याच शैलीत शहाजी पाटलांनी पुन्हा एक डायलॉग म्हटला आहे. मुख्यमंत्री शिंदेंसोबत शहाजी पाटलांसह अनेक बंडखोर आमदार विठ्ठलाच्या पूजेसाठी आज गेले आहे. आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे.
Web Title: Cm Eknath Shinde Solapur Shahaji Bapu Patil Shivsena Mla Ashadhi Ekadashi Maharashtra Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..