'हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांच्या पंगतीत बसलेल्यांना बोलण्याचा अधिकार नाही'

हिंदुत्ववादी विचारधारा घेऊ भाजपने त्यांच्याशी सलोखा केला.
'हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांच्या पंगतीत बसलेल्यांना बोलण्याचा अधिकार नाही'

तिकीट पक्षाचे असते, वर्षानुवर्षे मेहनत करून तयार केलेली वोटबँक पक्षाची असते. निवडणुकीमध्ये ही वोटबँक तुम्हाला मिळते. त्यामध्ये तुमचा चेहरा थोडासा उपयोगी पडतो. पक्ष कोणाचीही तिकीट उगाच कापत नाही, त्यामागे काही तरी कारण असते, या शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आमदार मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट करत टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याची प्रवीण दरेकर यांनी पाठराखण केली आहे. ते म्हणतात, व्होट बँकेचा (vote bank) अर्थ शब्दशहा घेऊ नका. छत्रपतींना मानणारा एक वर्ग आहे. चंद्रकांत दादांनी (chandrakant patil) त्या अर्थाने म्हटलेलं नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी केलं आहे.

यावेळी दरेकर यांनी संजय राऊत (Sanjay raut) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणतात, सचिन सावंत हे कुठे आहेत हे कुणालाच माहीत नाही? हिंदुत्वाची जाणीव बाळासाहेबांनी करून दिली आहे. हिंदुत्ववादी विचारधारा घेऊ भाजपने त्यांच्याशी सलोखा केला. ज्यांनी हिंदुत्वाला विरोध केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे.

'हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांच्या पंगतीत बसलेल्यांना बोलण्याचा अधिकार नाही'
कर्नाटकात 12 जागा मिळवत भाजपची जोरदार मुसंडी; कॉंग्रेसला मिळाल्या 11 जागा

दरेकर यांना आलेल्या सहकार नोटीसीसंदर्भात ते म्हणाले, मला तशा पद्धतीची नोटीस आलेली नाही. संस्थेला आली असेल तर त्याचे उत्तर ते देतील. नवाब मलिक यांच्या वक्तव्याला मी किंमत देत नाही. चौकशी करायची असेल तर करा. आमदारांच्या गाडी खरेदी संबंधित ते म्हणाले, ज्यांना गाडीच्या कर्जाची आवश्यकता नाही त्यांना कर्ज देऊ नये. ज्यांना गरज आहे त्यांना कर्ज द्या.

पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या काशी कार्यक्रमाविषयी बोलताना ते म्हणाले, या पूजेदरम्यान कॅमेरा फक्त मोदींवर होता हे आपण सर्वांनी पाहिले आहे. कारण कॅमेरा हा कायम हिरोवरच धरलेला असतो, असे गौरवउद्गार काढत त्यांनी विरोधकांचा चिमटा घेतला आहे.

'हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांच्या पंगतीत बसलेल्यांना बोलण्याचा अधिकार नाही'
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं; सख्खे 4 भाऊ 'आमदार'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com