अटकपूर्व जामिनासाठी प्रवीण दरेकरांची हायकोर्टात धाव

Pravin Darekar
Pravin Darekaresakal
Summary

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात उद्या सुनावणी करण्यात येणार असल्याचं कळतंय.

मुंबई : सध्या बॅंकेचं प्रकरण चांगलंच गाजताना दिसत आहे. मुंबई बँकेत (Mumbai Bank) मजूर म्हणून बोगस नोंद करून संचालक मंडळात निवडून गेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आज हायकोर्टात (High Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र, मंगळवारपर्यंत अटकेपासून दिलासा दिला होता. दरम्यान, दरेकर आता उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं कळतंय.

मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी असताना दरेकरांनी अनेक घोटाळे केले असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. प्रवीण दरेकर हे बँकेच्या संचालक मंडळावर निवडून गेले होते. मात्र, त्यांनी मजूर या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता.

Pravin Darekar
बंगाल विधानसभेत भाजप-टीएमसी आमदारांत जोरदार राडा

आता दरेकर यांनी बोगस पद्धतीनं मजूर म्हणून नोंदणी केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आता चौकशी देखील सुरूय. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) होणारी अटक टाळण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, सत्र न्यायालयानं दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com