Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण देशाच्या ऐक्‍याच्या विरोधात

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेले भाषण हे देशाच्या ऐक्‍याच्या विरोधात आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्ती असे बोलूच कशी शकते, असा प्रश्‍न मला पडला आहे.
Sharad Pawar and Narendra Modi
Sharad Pawar and Narendra Modisakal

पुणे - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेले भाषण हे देशाच्या ऐक्‍याच्या विरोधात आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्ती असे बोलूच कशी शकते, असा प्रश्‍न मला पडला आहे. म्हणूनच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याची वेळ आली आहे.' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा गुरूवारी समाचार घेतला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनामा गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, 'मी कृषीमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या गंभीर समस्या दाखविण्यासाठी अमरावतीला आणले होते.

त्यांना तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी आम्ही प्रत्यक्षात दाखविल्या. त्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. मागील दहा वर्षांत अमरावती, यवतमाळ व इतर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. कॉंग्रेसच्या काळापेक्षा आता दीड पट आत्महत्या होत आहेत.'

भाजप नेते अमित शहा यांच्यावर टीका करत पवार म्हणाले, 'मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात शेती संबंधीचे प्रश्‍न मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 2014 पासून आत्तापर्यंत अमित शहा यांच्या पक्षाकडे देशाची सत्ता आहे. शहा यांनी माझ्या कृषीमंत्री पदाच्या कार्यकाळावर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी अमित शहा व त्यांच्या पक्षाने काय केले, हे जनतेला सांगावे. शहा यांना शेतीविषयीचे ज्ञान मर्यादीत आहेत. त्याविषयी जास्त बोलायचे नाही''

पोलिस संरक्षणाबद्दल गृहमंत्र्यांचे आभार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना पुणे पोलिसांनी वाय प्लस पोलिस सुरक्षा दिली आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर "मुलांबद्दल आपण बोलणार नाही' असे सांगत पवार यांनी 'आमच्या कुटुंबातील मुलाला संरक्षण दिले, यासाठी गृहमंत्र्यांचे आभार' असा टोला लगावला.

एकनाथ खडसे आता आमचे नाहीत, ते भाजपमध्ये कधी प्रवेश करतील, याचे नियोजन भाजपने केले असेल, अशा शब्दात खडसे यांच्याविषयी प्रतिक्रीया दिली. तर छगन भुजबळांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, 'जुने सहकारी म्हणून छगन भुजबळांच्याविषयी सहानुभूती आहे. त्यांची तिकडे प्रचंड अवहेलना होत आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com