ब्रेकिंग न्यूज ! पोलिसांच्या हाती तुरी देऊन पंढरपुरातून कैदी पळाला; खुनाच्या आरोपाखाली होता अटकेत 

भारत नागणे 
रविवार, 12 जुलै 2020

शिवाजी भोसले याला 2016 मध्ये पत्नीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याला सध्या येथील सबजेलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी (ता. 11) त्याला कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यानंतर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास येथील त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी तो शौचविधीसाठी गेला होता. दरम्यान, पोलिसांची नजर चुकवून शौचालयाची खिडकी तोडून तो पळून गेला. 

पंढरपूर (सोलापूर) : खुनाच्या आरोपाखाली येथील सबजेलमध्ये अटकेत असलेला आरोपी आज येथील उपजिल्हा रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. हा प्रकार आज पहाटे येथील उपजिल्हा रुग्णालयात घडला. शिवाजी नाथाजी भोसले (रा. तिसंगी, ता. पंढरपूर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा : सोलापुरात कोरोनाचा उच्चांक! ग्रामीणमध्ये 107 तर शहरात 86 रुग्ण; पेंडिंग 290 रिपोर्टने वाढविली चिंता 

शिवाजी भोसले याला 2016 मध्ये पत्नीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याला सध्या येथील सबजेलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी (ता. 11) त्याला कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यानंतर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास येथील त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी तो शौचविधीसाठी गेला होता. दरम्यान, पोलिसांची नजर चुकवून शौचालयाची खिडकी तोडून तो पळून गेला. हा प्रकार काही वेळाने पोलिसांच्या लक्षात आला. रुग्णालयाच्या आवारात त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

हेही वाचा : सोलापूरसह शेजारच्या गावांमध्ये गुरुवारपासून कडक लॉकडाउन 

याबाबत उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. जयश्री ढवळे यांना विचारले असता, त्यांनी संबंधित आरोपी रुग्णालयामधील शौचालयाची खिडकी तोडून पळून गेल्याचे सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The prisoner escaped from Pandharpur