Court Order: राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा आधिक कैदी; न्यायालयाने व्यक्त केली चिंता

Crime News
Crime Newsesakal

मुंबईतील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने राज्यातील कारागृहांमधील मंजूर क्षमतेपेक्षा कैद्यांच्या अधिक संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘इसिस महाराष्ट्र मॉड्युल’ प्रकरणातील आरोपी शरजील शेख याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश ए. के. लाहोटीनी या मुद्द्यावर मत व्यक्त केले आहे.

आर्थर रोड कारागृहातून तळोजा तुरुंगात झोपण्यासाठी जागा नसल्याचे कारण देत त्याने दुसऱ्या तुरुंगात बदली करण्याची मागणी केली होती.

Crime News
Ratnagiri Jail : एकही परदेशी कैदी नसणारं रत्नागिरी कारागृह; राज्यात 655 परदेशी कैदी, आर्थररोडमध्ये सर्वाधिक

मुंबईतील आर्थर रोड कारागृहाची ९९९ कैदी ठेवण्याची क्षमता आहे; परंतु सध्या त्यात ३७०० कैदी तुरुंगवासात आहेत. प्रशासनातर्फे आरोपी शेखला इतर कारागृहात हलवण्यास हरकत नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

तसेच आर्थर रोड कारागृहात कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक असून दहशतवाद्यांसाठी असलेला विशेष कक्षही कैद्यांनी व्यापल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. विशेष कक्षामध्ये आधीच ४६ कैदी आहेत. संबंधित प्रकरणात अटक केलेल्या सर्व आरोपींना एकत्र तुरुंगात ठेवणे सुरक्षेसाठी गंभीर असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

Crime News
Yerawada Jail : कैद्याचा कारागृहातच २७ लाखांचा कारनामा

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी मुंबई मध्यवर्ती कारागृहातील अतिरिक्त कैद्यांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त करून, प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती न्यायालयाला देण्याचे निर्देश दिले आहेत.

Crime News
Yerawada Jail : कैद्याचा कारागृहातच २७ लाखांचा कारनामा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com