Prophet Row : महाराष्ट्रात आतापर्यंत 10 गुन्हे दाखल; पोलिसांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

protest i

Prophet Row : महाराष्ट्रात आतापर्यंत 10 गुन्हे दाखल

मुंबई : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन जिंदाल (Naveen Jindal) यांच्या विरोधात शुक्रवारी देशभरात जोरदार निदर्शने करण्यात आली. दिल्लीतील जामा मशीद, उत्तर प्रदेशातील प्रयागराज, कोलकाता, हैदराबाद, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब, रांची आणि बिहारसह अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रात 14 जिल्ह्यांत 117 ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. दरम्यान, या निदर्शनांनंतर महाराष्ट्र पोलिसांनी आतापर्यंत 10 गुन्हे दाखल केले आहेत. (Maharashtra Prophet Row Protest News )

शुक्रवारी महाराष्ट्रात करण्यात आलेल्या निदर्शनावेळी 7000 ते 7500 हजार लोक सोलापूर शहरात जमा झाले होते. नवी मुंबईत सुमारे 2000, नंदुरबारमध्ये 1500 ते 2000 लोकांचा जमाव जमला होता. तर, औरंगाबाद आणि परभणीत सुमारे 700-800 लोकांचा जमाव जमला होता, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. सोलापूरमध्ये एमआयएमच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाने मोठा मोर्चा काढला होता. याशिवाय नवी मुंबईत महिलांनी निषेध मोर्चा काढला होता.

हेही वाचा: 'नुपूर शर्मांवोरोधात निदर्शने करणारे MIM चे असू शकतात'

भाजपकडून संबंधितांवर कारवाई

दरम्यान, प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपने नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी केली आहे. तर, नुपूर शर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे. नुपूर आणि नवीन जिंदाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारतासह आखाती देशांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हेही वाचा: शर्मा, जिंदाल यांना अटक करा : ममता बॅनर्जी

पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो - भाजप

दुसरीकडे या वादाग्रस्त विधानावर भाजपने स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, भाजप सर्व धर्मांचा आदर करतो आणि कोणत्याही धर्माचा किंवा समुदायाचा अपमान करणार्‍या विचारसरणीला पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे म्हटले आहे. याशिवाय आखाती देशांच्या विरोधावर भारताने प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली असल्याचे सांगितले.

Web Title: Prophet Muhammad Row Protest 10 Cases Registered In Maharashtra For Protest

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top