
Kunal Kamra Got Donation : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत तयार करणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच तो देशात जिथे दिसेल तिथं त्याला चोप दिला जाईल अशी धमकी शिवसेनेनं दिली आहे. पण सरकारकडून अशा प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच जणू जनतेनं दिला आहे. कारण कुणाल कामराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा देत लोकांनी तब्बल ५ कोटी रुपयांवरुन अधिक मदत केली आहे. युट्यूबवरुन युजर्सनं त्याला ही मदत देऊन केली आहे.