
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'गद्दार' संबोधल्यानं कुणाल कामरा सध्या शिवसैनिकांच्या रडारवर आहे, हल्ल्याच्या भीतीनं सध्या तो तामिळनाडूत दडून बसला आहे. पण आपल्या ठिकाण्याची माहिती खुद्द त्यानंच जाहीर केली आहे. तसंच आता आपण मुंबई पोलिसांसमोर हजर होणार असल्याचंही त्यानं जाहीर केलं आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचं फोनवरुन बोलणं झालं आहे. राऊत यांनीच त्याला पोलिसांसमोर हजर होण्याचा सल्ला दिला.