esakal | 'NCP चे काही जण त्रास देतायत', गौरी गायकवाडांनी घेतली फडणवीसांची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Sarpanch Gauri Gaikwad

'NCP चे काही जण त्रास देतायत', गौरी गायकवाडांनी घेतली फडणवीसांची भेट

sakal_logo
By
सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: पुणे ग्रामीणच्या सरपंच गौरी गायकवाड (Gauri gaikwad) यांनी आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. भाजपाच्या (bjp) महिला नेत्या चित्रा वाघही (chitra wagh) त्यांच्यासोबत होत्या. गौरी गायकवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सुजित काळभोरने मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीच्या प्रकरणा संदर्भात ही भेट झाली.

राज्यातील सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते वैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला मारहाण करत असतील, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय आणि त्यामुळे अशा विषयांवर फडणवीस यांनी आवाज उठवावा अशी मागणी गौरी यांनी फडणवीसांकडे केली. गौरी या अपक्ष सरपंच आहेत. गौरी यांचे वडील भाजप पक्षाकडून सरपंच राहिले आहेत.

हेही वाचा: 'त्या' महिलेचा सचिन वाजे ग्राहक होता, महिन्याला देत होता ५० हजार

बैठकीनंतर गौरी गायकवाड काय म्हणाल्या?

"माझा व्हिडीओ तुम्ही पहिला आहे. व्हिडीओ तोडूनमोडून दाखवला. व्हिडीओ पोलीस घेऊन गेले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी हा व्हिडिओ व्हायरल झाला" असे गौरी म्हणाल्या. "मला काम करताना राष्ट्रवादीच्या काही सदस्यांकडून मानसिक त्रास दिला जातोय. एक महिला म्हणून न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायालयाकडून मला न्याय मिळेल. मी माझ्या मागण्या मांडण्यासाठी फडणवीसांकडे आली आहे" असे गौरी यांनी सांगितले.

हेही वाचा: पुण्यात निर्बंधांवर कोणी बोलत नाही, इथे लगेच ओरडतात - किशोरी पेडणेकर

"माझा नवरा आणि मुलाला संरक्षण मिळावं म्हणून मी पोलीस बंदोबस्ताची मागणी केलीय. मला झालेल्या त्रासाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. माझ्या गावात दुसऱ्या दिवशी लसीकरण बंद झालं. ते का बंद केलं, ते सुरू करावं. लसीकरण करताना, मी काम करत असताना माझ्यावर हल्ला झाला" असं त्या म्हणाल्या.

loading image
go to top