Kuchik Case l ...होय मी संगनमत केले; चित्रा वाघ

पिडीतेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते हा धक्कादायक प्रकार
Chitra Wagh and Uddhav Thackeray
Chitra Wagh and Uddhav ThackerayEsakal
Updated on

पुण्यातील शिवसेना नेता रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) बलात्कार प्रकरणात न्याय देणे बाजूलाच राहिले हे प्रकरण मिटवण्यासाठी वेळकाढूपणा केला जातो आहे अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. (Pune Kuchik case Suffering girl is safe now says chitra wagh)

Summary

पिडीतेवर उपचार न करता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते हा धक्कादायक प्रकार आहे.

Chitra Wagh and Uddhav Thackeray
भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकसंघपणे काम करेल- सतेज पाटील

चित्रा वाघ यांनी ट्विट करत या घटनेवर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, पिडीतेला वैद्यकीय उपचाराची गरज आहे. तिच्यावर उपचार न करता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते हा प्रकार धक्कादायक आहे. पीडीतेला न्याय देण्यापेक्षा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जादा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पीडित मुलीला न्यायासाठी साथ देणे संगनमत असेल तर होय मी संगनमत केले आहे असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Chitra Wagh and Uddhav Thackeray
संजय राऊत झेपतंय तेवढंच बोला; अतुल भातखळकरांचा टोला

राज्य सरकारवर घणाघात करताना त्या म्हणाल्या, १० वीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याने पोलिसात आत्मसमर्पण केले. इतरांसारखं आपल्यालाही पक्षाकडून वाचवलं जाणार याची आरोपीला खात्री आहे. सत्तेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या लंपट नराधमांना कोणताच कायदा लागू होत नाही असा राज्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Chitra Wagh and Uddhav Thackeray
मला विश्वासात घेतलं तर स्वाभिमानी सोबत,अन्यथा... : देवेंद्र भुयार

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना चित्रा वाघ म्हणाल्या, महाराष्ट्रराज्य पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विजया पालव यांच्यावर दिवा येथे जीवघेणा हल्ला झाला. महिलांवरील अत्याचारांनी कळस गाठलेल्या या निर्लज्ज महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात स्त्री असणे हा अपराध झालाय. मुख्यमंत्री घरात आणि गुन्हेगार मोकाट अशी परिस्थिती महाराष्ट्राची झाली आहे असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com