Wardha Crime News : १३ वर्षांनंतर न्याय! अल्पवयीन मुलगी पळवणाऱ्यास अखेर पुण्यातून अटक

Pune crime update: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कामगिरी; पथकाने शिताफीने सापळा रचून आरोपीस पुणे येथून ताब्यात घेतले.
Crime

Crime

sakal 

Updated on

Police arrest man for abducting minor : वर्धा तब्बल १३ वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्‍या आरोपीस पुणे येथून अटक करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ही कारवाई केली. १६ वर्षीय मुलीला किशोर नंदू जाधव (वय ३९) रा.गारपिट (कारंजा घा.) याने फूस लावून पळवून नेल्याबाबतची तक्रार खरांगणा पाेलिसांत दाखल करण्यात आली हाेती.

गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपी व पीडित मुलीबाबत संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली. आरोपी किशोर नंदू जाधव व अल्पवयीन मुलगी नारायणगाव (पुणे) येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने शिताफीने सापळा रचून आरोपीस पुणे येथून ताब्यात घेतले. पीडित मुलीबाबत विचारपूस केली असता मुलगी सोबत राहत असल्याचे त्याने सांगितले. आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास खरांगणा पाेलिस करीत आहेत.

Crime
Nitin Gadkari announcement: नितीन गडकरींकडून महाराष्ट्र-कर्नाटकशी निगडीत मोठ्या प्रकल्पास मंजुरी!, आंतरराज्यीय वाहतुकीस चालना मिळणार

ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात सुभाष राऊत, दिवाकर परिमल, खुशालपंत राठोड, नीतेश मेश्राम, अल्का कुंभलवार, नवनाथ मुंडे, अमित शुक्ला तसेच सायबर सेल येथील अक्षय राऊत, गोविंद मुंडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com