पराभव भाजपच्या जिव्हारी, महायुतीत मिठाचा खडा! शिवसेना युतीधर्म पाळणार का? बन यांचा थेट शिंदेंना सवाल

BJP on Shivsena Over Vidhan Parishad Result पुणे पदवीधर आणि संभाजीनगर शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या पराभवाचं खापर भाजपने शिवसेनेवर फोडलं आहे. यावरून महायुतीत अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.
Navnath Ban Questions Eknath Shinde

Navnath Ban Questions Eknath Shinde

Esakal

Updated on: 

राज्यात पाच विधानपरिषदेच्या जागांपैकी नागपूर पदवीधर, संभाजीनगर शिक्षक आणि पुणे पदवीधर या तीन जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं. तर पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षकची जागा भाजपने राखलीय. दरम्यान, शिवसेनेनं पुणे आणि संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतल्यानं महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल करत हा प्रकार गंभीर असल्याचं म्हटलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com