ठाकरे सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम; पुणतांब्यात 1 जूनपासून धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Puntamba Villagers

राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं होतं.

ठाकरे सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम; पुणतांब्यात 1 जूनपासून धरणे आंदोलन

पुणतांबा : राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन (Farmers Agitation) झालं होतं. हे आंदोलन देशातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरलं होतं. या आंदोलनाचा पाया अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे (Puntamba) येथील शेतकऱ्यांनी घातला होता. आता पुन्हा पुणतांब्यात शेतकरी जमले. त्यांनी शेतमालाला भाव मिळत नसल्यानं आंदोलनाची तयारी सुरू केलीय.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) पुणतांबा इथं किसान क्रांतीच्या झेंड्याखाली आंदोलनाला दिशा देण्यासाठी आज विशेष शेतकरी ग्रामसभा सुरू करण्यात आली. या सभेसाठी पुणतांबा रास्तपूर ग्राम पंचायतचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या ग्रामसभेत गावातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सरकारनं पाच जूनपर्यंत काही प्रतिसाद दिला नाही, तर आंदोलनाची दिशा वेगळी असणार असं सर्वानुमते ठरलं आहे.

हेही वाचा: Indian Army : जवान प्रथमेश पवार यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना 2017 मध्ये झालेलं आंदोलन हे मध्येच अर्ध्यावर सोडून आंदोलन संपलं असं सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन न संपवत पुढं सुरू ठेवून आंदोलन यशस्वी केलं. तसं करायचं असेल तर आंदोलन करून शेतकऱ्यांना फसवू नका. राजकीय पक्ष, नेत्यांपासून अलिप्त राहून आंदोलन लवकरात सुरू करावं या ग्रामसभेला भास्कर मोटकर, विठ्ठलराव जाधव, बाळासाहेब चव्हाण, मुरलीधर थोरात, सुहास वहाडने, सुभाष वहाडने आदी उपस्थित होते.

हेही वाचा: चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून; डोक्यात मारली लोखंडी पार

या आहेत मागण्या...

  • -उसासाठी प्रती टन 1000 सरकारनं अनुदान द्यावं.

  • -सर्व शेतीमालाला एफआरपी ठरवून कांद्याला 500 रुपये अनुदान मिळालं पाहिजे.

  • -गाळप न झालेल्या उसाला 200,000 रुपये हेक्टरी मिळावे.

  • -दिवसा वीज बारा तास मिळाली पाहिजे.

  • -कांद्याची, गहूची निर्यात बंद करण्यात येऊ नये.

  • -संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावं.

  • -अनुदान तसेच कर्जमाफी करिता कोणत्याही अटी शर्ती ठेऊ नये.

  • -सर्व पिकासाठी एक एसपीला कायदा करून किमान किंमत ठरवावी.

  • -दुधाचा एफआरपी निश्चित करण्यात येऊन सरकारनं तडजोड करून किमान किंमत लिटरला ४० रुपये दर करावा.

  • -2017 रोजी झालेल्या आंदोलक शेतकऱ्यावर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे.

Web Title: Puntamba Villagers Warn The Government Of Agitation From June 1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top