

Farmer Loan Waiver Scheme
ESakal
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना' जाहीर केली. मात्र या योजनेची अंमलबजावणी कधीपासून होणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून केला जात होता. याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे बऱ्याच काळापासून कर्जमुक्तीची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.