NCP Political Crisis: 'असे कोणते तीर्थ शिंपडले आणि ते पवित्र झाले?' आर आर आबांचा प्रश्न आजही अनुत्तरीत, रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ

Rashtravadi Congress : राष्ट्रवादीतून भाजप मध्ये गेलेल्या आमदारांविषयी आर आर आबांनी १० वर्षांपूर्वी विचारला होता प्रश्न
R. R. Patil
R. R. Patil esakal
Updated on

Rohit Pawar Share's R R Patil's Video : नुकतेच अजित पवार काही आमदारांसह शिंदे भाजप सरकार सोबत गेले. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली. काही आमदार शरद पवार यांच्या सह आहेत तर काही अजित पवार यांच्यासोबत आहेत. पण यापूर्वीही राष्ट्रवादीतून आमदार इतर पक्षांमध्ये गेले आहेत.

दहा वर्षांपूर्वी भाजप सत्तेत आल्यावर काही राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात गेले. त्यावळी राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांनी जाहिर सभेत जे भाषण केले होते, त्याचा व्हिडीओ राहित पवार यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, १० वर्षांपूर्वी आर आर आबांनी विचारलेले प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. या व्हिडीओचा संबंध थेट आजच्या परिस्थितीशी मिळता जुळता असल्याचे यातून सुचित होते.

या व्हिडीओमध्ये आर आर पाटील विचारत आहेत की, "ज्यांच्यावर आजपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केले आज त्यांना स्वतःच्या पक्षात घेतले आहे. मग त्यांच्यावर असे कोणते तीर्थ त्यांनी शिंपडले की, ज्यामुळे ते पवित्र झाले आहेत?"

R. R. Patil
Sharad Pawar Latest News : चक्क 48 आमदार सोडून गेल्यावरही पक्ष कसा नव्याने उभा करायचा, पवारांना माहित आहे...

याबरोबरच त्यांनी म्हटले होते की, "आया राम गया राम संस्कृतीला खतपाणी घालण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. आजवर हे लोक आमचा पक्ष साधूसंतांचा पक्ष असा दावा करत होते. पण अलिकडच्या काळात भारतीय जनता पक्ष हा साधूसंतांचा पक्ष नसून संधी साधूंचा पक्ष आहे हे सिद्ध झाले आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunil Tatkare Reacts to Political Strategy Buzz
Prashant Kishor Holds Strategy Talks With Sunetra Pawar Amid NCP Leadership Change Speculation in Maharashtra Politics
Congress Faces NCP Protest in Pune After Alleged Offensive Statement on Deputy Chief Minister Sunetra Pawar
NCP Sharad Pawar Group
Marathi News Esakal
www.esakal.com