महाविकास आघाडीत इच्छा नसतानाही काही निर्णय घ्यावे लागले; देसाईंचा नेमका निशाणा कोणावर?

'त्यावेळी आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नव्हता.'
Shambhuraj Desai MahaVikas Aghadi Government
Shambhuraj Desai MahaVikas Aghadi Governmentesakal
Summary

'त्यावेळी आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नव्हता.'

कऱ्हाड (सातारा) : महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi Government) आम्ही असताना काही निर्णय हे इच्छा नसतानाही अनिश्चेने घ्यावे लागले. मी अर्थराज्यमंत्री असूनही मला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. आमचं सरकार आल्यावर राज्याच्या हितासाठी काही निर्णय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी बदलले, अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली.

मंत्री देसाई पुढं म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये मी गृहराज्यमंत्री, अर्थराज्यमंत्री होतो. त्यावेळी आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नव्हता. त्यामुळं काही निर्णय हे आम्ही मंत्री असतानाही अनिश्चेने घ्यावे लागले होते. त्यामध्ये राज्याचं हित नव्हतं. आमचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही निर्णय राज्याच्या हितासाठी बदलले आहेत. त्यामुळं त्यातून राज्याचा फायदाच होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Shambhuraj Desai MahaVikas Aghadi Government
शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्षश्रेष्ठींना सल्ला

चोरटी दारु रोखण्याचे आदेश

राज्याला उत्पादन मिळवून देणारे तिसऱ्या क्रमांचे उत्पादन शुल्क विभाग आहे, असं सांगून ते म्हणाले, माझ्याकडील विभागाने १८ हजार कोटी रुपयांचा निधी सरकारी तिजोरीत जमा केला आहे. कर चुकवेगिरी, बॉर्डरच्या जिल्ह्यातून होणारी चोरटी दारु वाहतूक रोखण्यासाठी नवीन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यातून माझ्याकडील विभागाचे उत्पन्न वाढवण्याचा माझा प्रयत्न राहील, असंही देसाईंनी सांगितले.

Shambhuraj Desai MahaVikas Aghadi Government
सध्याचे मुख्यमंत्री जमिनीवर चालणारे, त्यांना हवाई सफर आवडत नाही : शंभूराज देसाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com