Rahul Gandhi : भारत न्याय यात्रेत राहुल गांधींच्या 'डुप्लिकेट'चा वापर; आसामच्या मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या भारत न्याय यात्रेबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. राहुल गांधींच्या यात्रेमध्ये राहुल यांच्याऐवजी त्यांच्या डुप्लिकेटचा वापर होतोय, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
Rahul Gandhi
Rahul Gandhi esakal

गुवाहाटीः आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या भारत न्याय यात्रेबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. राहुल गांधींच्या यात्रेमध्ये राहुल यांच्याऐवजी त्यांच्या डुप्लिकेटचा वापर होतोय, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

मुख्यमंत्री सरमा यांनी मीडिया रिपोर्टच्या हवाल्याने म्हटलय की, भारत जोडो यात्रेच्या बसमध्ये राहुल गांधीच्या 'बॉडी डबल'चा वापर होतो आहे. न्यूज एजन्सी एएनआयने 'एक्स' हँडलवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये आसामचे मुख्यमंत्री म्हणतात, आसामध्ये सध्या एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, राहुल गांधी यात्रेमध्ये डुप्लिकेट इसमाचा वापर करत आहेत. त्यावरुनच चर्चा होत आहेत.

Rahul Gandhi
IND vs ENG : यशस्वीनं दाखवला 'भारतीय जैसबॉल', इंग्लंडविरूद्ध 108 च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं नाबाद अर्धशतक

ANI ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हिमंता बिस्वा सरमा यांनी 'इंडिया टुडे नॉर्थ ईस्ट'चा हवाला देत म्हटलं की, बसमध्ये जे राहुल गांधी दिसत आहेत ते खरे राहुल गांधी नाहीत. राहुल गांधी आतमधल्या आठ लोकांच्या बैठकीसाठीच्या एका रुममध्ये असतात.

दरम्यान, राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा १४ जानेवारीपासून सुरु झालेली आहे. गुरुवारी ही यात्रा पश्चिम बंगालच्या बशीरहाटमध्ये पोहोचली आहे. येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी आणि अन्य नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं.

Rahul Gandhi
Iran Vs Pakistan: मित्र राष्ट्र असणाऱ्या इराणने पाकिस्तानवर हल्ला का केला? असा आहे संघर्षाचा इतिहास

राहुल गांधींना अटक करणार- मुख्यमंत्री

भारत जोडो यात्रेदरम्यान हिंसा भडकावल्याचा आरोप राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांवर करण्यात आलेला आहे. पोलिसांनी स्वतः दखल घेत २३ जानेवारी रोजी एफआयआर दाखल केलेला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा बुधवारी म्हणाले की, आम्ही राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल केलेली आहे. एक विशेष तपास पथक तपासणी करेल आणि लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com