esakal | 'त्या' वक्तव्यानंतर राहुल गांधींनी केला उद्धव ठाकरेंना फोन..म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi and udhav thackeray

भाजपकडून सतत महाविकास आघाडीवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही काल महाविकास आघाडीला घरचा अहेर दिला आहे. मात्र हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यावर राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळतेय. 

'त्या' वक्तव्यानंतर राहुल गांधींनी केला उद्धव ठाकरेंना फोन..म्हणाले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: देशासह राज्यात कोरोना व्हायरसच्या महाभयंकर संकटामुळे केंद्र आणि राज्य सरकारची झोप उडाली आहे. मात्र राज्याचं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. विरोधी पक्ष भाजपकडून सतत महाविकास आघाडीवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही काल महाविकास आघाडीला घरचा अहेर दिला आहे. मात्र हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यावर राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळतेय. 

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये यावरून विरोधी पक्षानं महाविकास आघाडीला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारेवर धरायला सुरुवात केली आहे. भाजपकडून निरनिराळ्या प्रकारे महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणीही करण्यात आली आहे. 

मोठी बातमी - राज्यपालांनी जारी केली अधिसूचना..'या'लोकांना होणार फायदा.. 

मात्र या सगळ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये काहीतरी बिघाडी आहे हे सूचित करणारं एक विधान केलं होतं. या त्यांच्या विधानाला माध्यमांनी चांगलंच उचलून धरलं. उद्धव ठाकरेंनीही मातोश्रीवर तातडीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामुळे राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळतेय. 

काय म्हणाले होते राहुल गांधी: 

''राजस्थान, पंजाब,पुदुच्चेरी आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. या राज्यांमध्ये आम्ही स्वंत्रतपणे निर्णय घेऊ शकतो. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. यात काँग्रेस सगळ्यात लहान पक्ष आहे तर राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन मोठे पक्ष आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस तसे निर्णय घेऊ शकत नाही जसे काँग्रेस इतर राज्यांमध्ये घेते," असं राहुल गांधींनी त्यांच्या संवादादरम्यान म्हटलं होतं. मात्र या त्यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत काही बिनसलंय का अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून या संदर्भात बातचीत केली आहे. 

हेही वाचा:धक्कादायक ! आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

फोनवर काय म्हणाले राहुल गांधी: 

या संकटाच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार स्थिर आहे आणि काँग्रेस पक्ष या कोरोनाच्या काळात महाविकास आघाडीच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी आहे," असं राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून आश्वस्त केलंय. त्यामुळे महाविकास आघडीत कुठेही मतभेद नाहीत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केलाय.   

rahul gandhi called udhhav thackeray read full story