Rahul Shewale : आदित्य ठाकरेंवरील टीका शेवाळेंना महागात; 'ते' व्हिडीओ पुन्हा व्हायरल

Aditya Thackeray and Rahul Shewale
Aditya Thackeray and Rahul Shewale

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयने शिवसेनेचे नेते आणि माजीमंत्री आदित्य ठाकरे यांना काही दिवसांपूर्वीच क्लिनचीट दिली आहे. या प्रकरणात नारायण राणे कुटुंबाकडून सातत्याने आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं होतं. मात्र आता या प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उडी घेतली. मात्र हे प्रकऱण त्यांना चांगलचं महागात पडत असल्याचं चित्र आहे. राहुल शेवाळेंचे ते व्हिडीओ व्हायरले करण्यात आले आहेत. ( Rahul Shewale news in Marathi)

Aditya Thackeray and Rahul Shewale
Uddhav Thackeray : राजा तू चुकतोस... उद्धव ठाकरेंनी कुणाला दिली समज?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राहुल शेवाळे यांच्यावर जुलै महिन्यात बलात्काराचे आरोप झाले होते. तरुणीने थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. तेव्हा मोठा वाद झाला होता. त्यानंतर शेवाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता ठाकरे गटाकडून राहुल शेवाळे यांचे त्याच तरुणीसोबतचे व्हिडीओ व्हायरल करण्यात आले आहेत. यात ते तरुणीला लीप किस करताना दिसून येतात. त्यामुळे शेवाळे यांना आदित्य ठाकरेंवरील टीका महागात पडल्याचं चित्र आहे.

Aditya Thackeray and Rahul Shewale
Disha Salian : आदित्य ठाकरे अडचणीत? 'त्या' प्रकरणाच्या चौकशीबाबत CM शिंदेंचं सूचक विधान

खासदार राहुल शेवाळे यांचे व्हिडिओ याआधीही व्हायरल झाले होते. मात्र आता पुन्हा राहुल शेवाळे ट्रोल होतायेत. आदित्य ठाकरे यांनी देखील शेवाळे यांच्यावर खोचक टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, शेवाळे यांचं लग्न आम्ही कस वाचवलं हे आम्हालाच माहित आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राहुल शेवाळेच्या मागणीनंतर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कऱण्याचे संकेत दिले आहेत. या प्रकरणाची माहिती घेऊन बोलतो, असं म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com