

Raigad ZP Election
ESakal
अलिबाग : महाराष्ट्र्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी शनिवारी (ता. ७) संपली आहे. मात्र, मतदान झाल्यानंतर आता निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. रायगड जिल्ह्यात सरासरी ७२ टक्के मतदान झाले असून रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गटांतील १७३ उमेदवार आणि १५ पंचायत समित्यांमधील ३२९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. मात्र आता रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत पहिला विजय समोर आला आहे.