raigad hatti talaw
raigad hatti talaw

रायगडावरून हत्ती तलावाबाबत आनंदाची बातमी! संभाजीराजे म्हणाले,'असे क्षण खूप कमी'

रायगड - रायगडवर असलेला हत्ती तलाव पाण्यानं पूर्ण भरला आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते गेल्या दीडशे वर्षांत तो पहिल्यांदाच पुर्ण क्षमतेनं भरला आहे. याबाबत खासदार संभाजीराजी छत्रपती यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "असे क्षण जीवनात खूप कमी येतात! ज्याचं समाधान आयुष्यभर लाभतं.  सर्व शिवभक्तांना सांगताना आनंद होत आहे, की रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून आपण जे काही काम हाती घेतले, त्याला यश येत आहे. हत्ती तलावाचे 80% काम पूर्ण झाले असून तलावाला अजूनही एक जागेत गळती आहे. त्या गळतीचा व्यवस्थित अभ्यास करून ती सुद्धा काढून घेतली जाईल."
 

संभाजीराजेंच्या अध्यक्षतेखाली 'रायगड विकास प्राधिकरण' च्या माध्यमातून रायगड किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. गडावर असलेल्या तलाव व टाक्यामध्ये वर्षानुवर्षे गाळ साचल्यामुळे त्यांची जलधारण क्षमता खुप कमी झाली होती.तसेच तलावांना ठिकठिकाणी गळती लागल्यामुळे साठलेल्या पाण्याचा मोठ्याप्रमाणात अपव्यय होत होता. त्यामूळे प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम गडावरील महत्वाच्या तलावातील, टाक्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. प्रथम टप्प्यात प्राधिकरणा मार्फत गडावरील 84 पैकी 21लहान मोठे टाके व तलाव यातील गाळ काढण्याचे निश्चिंत करण्यात आले.

हत्ती तलावाला अजूनही फक्त एका ठिकाणी अगदी छोट्या प्रमाणात गळती आहे. कोरोनामूळे व खास हत्ती तलावासाठी तयार केलेले गळती काढण्याचे मशिन खराब झाल्याने येथील काम करता आले नाही. पण ती गळतीसुध्दा लवकर काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. हत्ती तलावाची गळती काढण्याचे काम मागील पावसाळ्यानंतर सुरू करण्यात आले होते. मागील पावसाळ्यानंतर या सर्व गाळ काढण्याच्या कामांचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. त्यामूळे उरलेल्या सर्व टाक्यांचा गाळ व गळती काढण्याची कामे पुर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

तलावातील नैसर्गिक कातळावर पाणी आडवण्याकरता जी भिंत बाधंण्यात आली होती त्यातील सांध्याच्या जागेवरील बांधकामाचे(दोन दगडा मधील) मिश्रण मृत झाले आहे. ते मिश्रण नव्याने त्या सांध्याच्या जागेवर भरणे गरजेचे आहे ज्यामुले ही गळती पुर्णपणे बंद होण्यास मदत होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com