

Nashik to Mumbai Local Train
ESakal
मुंबई : नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने अखेर एक महत्त्वाचा आणि बहुप्रतिक्षित निर्णय घेतला आहे. नाशिक ते मुंबई रेल्वे प्रवास नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. थेट गाड्या नसल्यामुळे प्रवाशांना आधीच गर्दी असलेल्या गाड्यांमध्ये जागा शोधण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) च्या आधीच्या स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला, कारण लांब पल्ल्याच्या गाड्या लहान स्थानकांवर थांबत नव्हत्या.