

Shaktipeeth Expressway Maharashtra Infrastructure Project Railway Missing Link
esakal
Railway Missing Link : अरविंद मोटे : नागपूर ते गोवा या प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाला राज्यभरातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत असताना, या महामार्गाला एक अत्यंत व्यवहार्य, स्वस्त आणि शेतकरीभिमुख पर्याय पुढे आला आहे. सुमारे ८६ हजार कोटी रुपये खर्चून शेकडो हेक्टर सुपीक बागायती जमीन संपादित करण्याऐवजी, गोवा (वास्को-द-गामा) ते गडचिरोली या पट्ट्यातील अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गांमधील मोजके ‘मिसिंग लिंक्स’ (जोडमार्ग) पूर्ण केल्यास अधिक प्रभावी आणि शाश्वत ‘आर्थिक कॉरिडॉर’ उभा राहू शकतो, अशी अभ्यासपूर्ण मांडणी वाहतूक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केली जात आहे.