

Ganeshotsav Rain Forecast Maharashtra
esakal
Maharashtra Monsoon Update : राज्यात पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आठवड्याच्या अखेरीस दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवार ११ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाला सुरुवात होऊ शकते. शनिवार १२ सप्टेंबरला पावसाचा विस्तार आणखी काही भागांत होण्याचा अंदाज आहे.