

Rain Prediction in Maharashtra
esakal
Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटमुळे वाढलेला उकाडा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातील हवामानाची स्थिती आणि दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सूनच्या पावसासाठी अनुकूल होत असलेल्या वातावरणामुळे राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुणे घाटमाथ्यासह रायगड, पुणे, सातारा, बीड आणि जालना जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात गुरुवारपासून काही ठिकाणी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होणार असल्याने उन्हाचा चटका काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.